वडिलांच्या मित्रानेच केले लैंगिक शोषण

वडिलांच्या मित्रानेच केले लैंगिक शोषण

पुणे (रफिक शेख) : वडिलांच्या मित्रानेच साथीदाराच्या मदतीने शरीरसंबंधाचा व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेला तिचे रो हाऊस जबरदस्तीने विकायला भाग पाडून पैसेही हडप केले. याप्रकरणी फुलेनगर येथे राहणाऱ्या एका ४० वर्षांच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विमानतळ पोलिसांनी पुरुषोत्तम लाल बुटानी (रा. खेसे पार्क, लोहगाव), वासुदेव पाटील (रा. खेसे पार्क, लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१२ पासून सुरु होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम बुटानी हा फिर्यादी यांच्या वडिलांचा मित्र आहे. त्याचे व फिर्यादी यांचे २०१२पासून प्रेमसंबंध होते. बुटानी याने फिर्यादी यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना लोहगाव, बाणेर, वाघोली येथील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन त्यांच्याबरोबर शरीरसंबंध निर्माण केले. वासुदेव पाटील याने या दोघांच्या शरीरसंबंधाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर दोघांनी महिलेला तिच्या नावावर असलेला रो हाऊस विकण्यास सांगितले. त्या बदल्यात त्यांना एक दुकान व फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले. विरोध दर्शविल्यावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन रो हाऊसच्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या.

About The Author

error: Content is protected !!