लातूरच्या खेळाडुंची आंतरराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

लातूरच्या खेळाडुंची आंतरराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

लातूर (प्रतिनिधी) : महाबळेश्वरच्या पंचगनी येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल थाईबॉक्सिंग स्पर्धेमध्ये कोच फरहान नबीजी यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरच्या चार खेळाडुंनी सुवर्ण पदक, एकाने रौप्य तर अन्य एका खेळाडुने कांस्य पदक पटकावले असून या खेळाडुंची अबुधाबी येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेत सोनिया राजेंद्रकुमार जायभाये हिने सुवर्ण पदक, शिवा त्रिवेदी याने सुवर्ण पदक, साहिल पठाण याने सुवर्ण पदक, विवेक कांबळे याने सुवर्ण पदक, सूरज यादव याने रौप्य पदक व झैद शेख याने कांस्य पदक प्राप्त केले आहे. या खेळाडुंना कोच फरहान नबीजी, सय्यद अब्दुल रजाक व श्रुष्टी त्रिवेदी यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडुंनी राष्ट्रीय टाइटल बेल्ट जिंकून लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचा नावलौकिक केला आहे. या सर्व खेळाडुंची अबुधाबी येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुढील स्पर्धेमध्येही अशीच उत्कृष्ठ कामगिरी करून लातूर जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा कोच फरहान नबीजी यांनी खेळाडुंना दिल्या आहेत.

About The Author