मुलीच्या इच्छेविरुद्ध वारंवार बलात्कार; गुन्हा दाखल

मुलीच्या इच्छेविरुद्ध वारंवार बलात्कार; गुन्हा दाखल

मंचर (रफिक शेख) : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात अज्ञात इसमाने एका मुलीवर वारंवार बलात्कार केला. या संबंधातून तिने एका मुलीला जन्म दिला आहे. या संदर्भात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात २५ मार्च, २०२२ अगोदरपासून नऊ ते दहा महिन्यांपूर्वी अज्ञात इसमाने १८ ते २० या दरम्यान वय असलेल्या मुलीशी तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार बलात्कार केला. या संबंधातून संबंधित मुलगी गर्भवती राहिली. त्यातून तिने एका मुलीला जन्म दिला आहे. या पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार, अज्ञात व्यक्तीविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

About The Author