दुकानाचे शटर तोडून पाण्याच्या पाच मोटार चोरीला

दुकानाचे शटर तोडून पाण्याच्या पाच मोटार चोरीला

पिंपरी (प्रकाश इगवे) : दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, पाण्याच्या पाच मोटर व डीव्हीआर मशीन असा ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. निगडी तळवडे, रस्त्यावरील काजल इलेक्ट्रिकल दुकानात रविवारी (दि. ३) रात्री आठ ते सोमवारी (दि. ४) सकाळी साडेसहा या कालावधीत हा प्रकार घडला. शरद सखाराम जीभकाटे (वय ४६, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ४) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या काजल इलेक्ट्रिकल नावाच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातून रोख रक्कम पाण्याच्या पाच मोटार व डीव्हीआर मशीन असा ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तसेच दुकानात बसवलेला कॅमेरा तोडून नुकसान केले.

About The Author

error: Content is protected !!