अडीच लाख रुपये हुंडा घेऊनही विवाहितेचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अडीच लाख रुपये हुंडा घेऊनही विवाहितेचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी (रफिक शेख) : अडीच लाख रुपये हुंडा घेऊनही विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात तसेच सातारा येथे १८ जून २०१७ ते ७ फेब्रुवारी २०२० या कालावधीमध्ये घडली. याप्रकरणी ३१ वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. ४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विवाहितेचा पती जयेश पाटील, सासरे अरुण पाटील, दीर योगेश पाटील, सासू आणि जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून पीडितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच पती जयेश याने विवाहितेचे दागिने तिच्या संमतीशिवाय काढून घेतले. फिर्यादीच्या वडिलांकडून हुंडा म्हणून दोन लाख ५१ हजार रुपये घेतले.

About The Author

error: Content is protected !!