निष्पाप पुजाऱ्याच्या हत्याऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी; बहुभाषिक ब्राह्मण सभेची मागणी

निष्पाप पुजाऱ्याच्या हत्याऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी; बहुभाषिक ब्राह्मण सभेची मागणी

अहमदपूर (गोविंद काळे) : शेपवाडी ता अंबेजोगाई जि बिड येथील निष्पाप पुजाऱ्याच्या हत्याऱ्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी बहुभाषिक ब्राह्मण सभा अहमदपूर शाखेच्या वतीने नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे तहसीलदार यांच्या मार्फत एका निवेदनाद्वारे केली आहे. याविषयी सविस्तर माहीती अशी की शेपवाडी ता अंबेजोगाई जिल्हा बिड येथे राज्यात गुडीपाडव्याच्या पवित्र दिवशी हनुमान मंदिराचे पुजारी संतोष दत्तोपंत पाठक यांची हत्या करण्यात आली आणि खुन्याला अटक केली असली तरीही त्याचे साथीदार, कट करणारे अद्यापही सापडलेले नाहीत त्यामुळे राज्यातील समस्त ब्राम्हण समाज संतप्त झाला आहे, आपल्या राज्यात सातत्याने ब्राम्हण पुजारी, साधूसंत यांच्या हत्या होत असल्यामुळे ब्राम्हण समाजच नव्हे तर सर्व समाजात भीती तसेच संताप निर्माण झाला आहे . गुडीपाडव्याच्या दिवशी एका पुजाऱ्यांची हत्या होऊनहि तातडीने सर्व कारस्थानी पकडले न जाणे हे आपल्या पोलिसांचे मोठे अपयश आहे कि मुख्य गुन्हेगाराला संरक्षण दिले जात आहे असा प्रश्न संपूर्ण समाजाला पडला आहे. आपण या प्रकरणी तातडीने लक्ष घालून येतील सर्व गुन्हेगारांना अटक करावी व जलदगती न्यायालयात खटला चालवुन त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत अशी आमची मागणी आहे. आपण यासंदर्भात तातडीने कृती न केल्यास आम्हास नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल याची आपण नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार अहमदपूर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना नुकतेच देण्यात आले आहे. सदरील निवेदनावर ज्येष्ठ पत्रकार उदय जोशी, भाजप नेते धनंजय जोशी, डाॕ. मेजर मधुसूदन चेरेकर, अॕड. सुहास पाटील, अॕड. सोपान शिवणे, डाॕ. सुहास जोशी, सागर कुलकर्णी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author