सामाजिक कार्यकर्ते सहदेव व्होनाळे यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

सामाजिक कार्यकर्ते सहदेव व्होनाळे यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते सहदेव सुर्यकांत होनाळे यांना महात्मा फुले ब्रिगेड व संत शिरोमणी सावता माळी सेवा भावी संस्था यांच्यावतीने लातूर येथे रविवारी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार देऊन सपत्निक सन्मान करण्यात आला. यावेळी महात्मा फुले ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंह सैनी (राजस्थान), माजी खासदार तथा माजी कुलगुरू डॉ जनार्धन वाघमारे, ज्येष्ठ विचारवंत विधिज्ञ मनोहर गोमारे, माजी खासदार डॉ सुनिल गायकवाड, दिपरत्न निलंगेकर, महात्मा फुले ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष दत्ता चांभरगे, प्रदेश सचिव उत्तम गोरे, महिला प्रदेश उपाध्यक्ष वर्षा माळी आदी उपस्थित होते .

About The Author