प्रा. वैशाली मून यांना पीएच. डी. प्रदान
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील प्रा. वैशाली दिनेश मून यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच. डी प्रदान करण्यात आली आहे. प्रा. वैशाली मुन ह्या सध्या सुभाष अण्णा कुल शिक्षण शास्त्र ( बी. एड.) महाविद्यालय पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे येथे मराठी विषयाच्या अधिव्याख्याता म्हणून गेल्या १४ वर्षापासून काम करत असून नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी त्यांच्या’ बी. एड. प्रशिक्षणार्थी याची सृजनशीलता विकासासाठी तयार केलेल्या कृती कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचा अभ्यास’ या प्रबंधात मान्यता देऊन त्यांना पीएचडी प्रदान करण्यात आले आहे. त्यांना या कामी डॉ. मोहन कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले होते . त्यांच्या या यशाबद्दल राहुल कुल, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या शिक्षण शास्त्र विभाग प्रमुख डॉ . मेघा उपलाने, डॉ. प्रशांत पगारे, प्राचार्या डॉ. निलिमा तिघे, डॉ. महेंद्र कांबळे, प्रा. डॉ. नारायण कांबळे, प्रा. डॉ. श्रीरंग खिल्लारे, प्रा. सौ. सोनाली उदगीरकर, सौ. दीपाली कांबळे, प्रा. रुपाली जगताप, प्राचार्य डॉ. वामनराव जगताप, पत्रकार विलास चापोलीकर, प्रा. डॉ. बालाजी कारामुंगीकर, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, आनंद माने, दयानंद गुंजरगे बालाजी, गुंजरगे, अड. रमेश गायकवाड, सुमन सोनकांबळे, सुमन सोनकांबळे, शालिनीताई चापोलीकर, डॉ. शीतल चापोलीकर आदींनी अभिनंदन केले आहे.