ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा केंद्राचा 10 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा केंद्राचा 10 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील “स्पर्श” द एम्फटाटीक टच सेवा भावी संस्था अंतर्गत ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा केंद्र यांचा आज 10 वा वर्धांपण दीन. या निमित्त यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अकॅडमी चे संचालक उधव इप्पर, प्रमुख पाहुणे अहमदपूर चे कृतव्या दक्ष पोलीस निरीक्षक चीतांबर कामठेवाड तर मुख्य मार्गदर्शक म्हणुन प्राचार्य डॉ वसंत बिराजदार हे होते. प्रास्ताविक मध्ये इप्पर म्हणाले की अकॅडमी ची सुरुवात 2012 मध्ये आमचे प्रेरणास्थान मंचाक जी इप्पर, आयपीएस यांच्या प्रेरणेतून उभा करन्यात आली होती पोलीस, आर्मी, नेव्ही बीयसफ, तलाठी, ग्राम सेवक, रेल्वे अश्या प्रतेक क्षेत्रात आता पर्यंत हजोरो विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. अकॅडमी सामजिक कार्य पण करते, झाडे लावणे, रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर अशे अनेक उपक्रम अकॅडमी चे माध्यमातून केली जातात.

कामठेवड यांनी विधर्थ्यान मार्गदर्शन करताना सांगितलें की यशस्वी होण्यासाठी सातत्य महत्वाचे आहे. जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेवढ्या लवकर यश मिळते. ज्ञानदीप अकॅडमी यावढे कमी पैशात तुम्हाला प्रशिक्षण देते आणि नोकरी लागल्यावर पैसे घेत नाही म्हणजे खुप मोठी गोष्ट आहे. याचा सर्वनी फायदा घेऊन जस्तीती विद्यार्थि यशस्वी झाले पाहिजे.

बिराजदार म्हणले की आपल्या ग्रामीण भागात तेवढे उच्च दर्जाचे प्रशिक्षण देणारी हि अकॅडमी आहे. रम्य वातावरण आहे. यश हे कष्टातून मिळते, पोस्ट हि छोटी असो किंवा मोठी असो जेवढी जास्त मेहनत कराल तेवढे यश मोठे मिळते. प्रा. सतीश ससाणे, प्रा. मोरे सर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थीनी आपल्या मनोगतात अर्चना म्हणली की मी कॅम्प ल एडमिशन घेतले तेव्हा ग्राउंड ल 10 मार्क व लेखीला 24 मार्क मिळाले होते. पण तेच मी प्रॅक्टीस नंतर 21 किमी रानिग इप्पर सर बरोबर करत होतें, एक वर्षात मी ग्राउंड हे आऊट ऑफ घेत होते तर गणितमध्ये पटेवड सर मुळे 50 पैकी 50 मार्क घेत होतें. शीतल म्हणली की ज्ञानदीप अकॅडमी एवढी सेफ अकॅडमी कुठेच नाही. उमाकांत म्हणले की मी येथिल स्टाफ हा पुर्ण सहकार्य करणार आहे. सचिन यांनी सांगितलं की येथिल ग्राउंड व लेखीचे क्लास खुप चांगले होतात म्हणूनच मोठया प्रमाणात विद्यार्थी यशस्वी होतात. सुत्रसंचलन प्रा. चिमणराव कावळे तर आभार प्रा. अमोल वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यस्वीतेसाठी प्रा. नितीन गुट्टे, राम मेजर, जितेंद्र मेजर, प्रकाश राठोड, संदीप नरोटे महीला प्रशिक्षक सांची कांबळे, अर्चना करपे यांनी केले.

About The Author