भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानोबा चाटे यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्याचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा चाटे यांची रविंद्र देविदी मुंबई प्रणित भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या लातुर जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतीच कामिनी निवास पांडूरंगवाडी मिरा ठाणे येथील कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली असुन भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र देविदी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे या निवडीबद्दल आदर्श पुरस्कार प्राप्त प्राध्यापक गोविंद भगत,स्वेत मोगरगे, आनंद वरवटे, बालाजी चावरे, राहुल गुणाले, प्रकाश रोकडे, संजय बोबडे, संजय सातपुते, मन्मथ प्रयाग, शेख जहाँगीर , गोविंद बडे, गंगाधर हेंगणे, संदिप मुरकुटे, राजु पाटील, कैलास झुंनझुंनवार , गजानन पारसेवार, अमोल मोरे, नरसिंग चावरे, गजानन हाडोळे, पद्माकर मोरे आदींनी अभिनंदन केले आहे