बियाणी हत्याकांडा प्रकरणी चौकशी मागणी साठी अहमदपूरात उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा
अहमदपूर (गोविंद काळे) : नांदेड येथे बांधकाम व्यावसायिक,समजातील 73 गरीब गरजूंना अल्पकिमतीत घरे बांधून देणारे समाज भूषण,व्यवसायातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारे संजय बियानी यांचा नांदेड शहरात भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्ये प्रकरणी अहमदपूर शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून अश्या घटनेमुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असून या हत्याकांडाची तात्काळ चौकशी करून त्यांना अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणी साठी आज दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता अहमदपूर शहरातील क्षीप्र अष्टविनायक मंदिर येथून मूक मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असून सदरील मोर्चात सर्व जनतेने व व्यापारी वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय मारवाडी युवा मंच, माहेश्वरी सभा, युवा माहेश्वरी, महिला माहेश्वरी, तथा राजस्थानी महिला मंडळ यांनी आवाहन केले आहे.