जीवनात घडणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद मनमुराद लुटावा – सुरेश जैन
लातुर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित ‘पर्यावरण जलव्यवस्थापन व स्वच्छ भारत अभियान आणि युवक-युवती नेतृत्त्व विकास शिबीर’ या शिबीराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव मा. सुरेशजी जैन हे लाभले होते. प्रस्तुत निवासी शिबीरामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानाची पाहणी करत असताना गावात आणखी काय उपक्रम राबवता येऊ शकतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिबीराच्या या कालावधीमध्ये विविध बौध्दीक कार्यक्रम तसेच सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या बद्दलचे कौतुक त्यांनी केले. दयानंद शिक्षण संस्था ही लातूर आणि लातूर परीसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून स्थापन करण्यात आली आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास हे आमचे ध्येय असून त्यासाठी पुरक वातावरण निर्माण करण्यास दयानंद शिक्षण संस्था कटिबद्ध आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबीरातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षणाचा आनंद मनमुराद लुटावा असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांनी मी दयानंद कला महाविद्यालयाचा विशेषत: राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा माजी विद्यार्थी आहे. ग्रामीण भागातून आलेला एक सामान्य विद्यार्थ्यांपासून ते राष्ट्रपती पुरस्कार (एन एस एस इंदीरागांधी पुरस्कार 2015-16) मिळण्यापर्यंत माझा जो विकास झाला त्यामध्ये दयानंद कला महाविद्यालयाचे योगदान आहे हे ऋण मी विसरु शकत नाही. या विद्यार्थ्यांच्या जडण घडणीत हे शिबीर उपयुक्त असून विद्यार्थ्यांनी या सगळया उपक्रमाचा यथोचित लाभ घ्यावा व स्वत:चा व्यक्तीमत्त्व विकास करावा असे मनोगत व्यक्त केले.
या सात दिवसीय शिबीरामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संत गाडगे बाबा या संघाचा सन्मान केला, उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणुन अविनाश भांडेकर, अभिषेक गुरमे, स्वयंसेविका कु. राधा लोंढे शिबीराचे व्यवस्थापन चांगल्यापध्दतीने केल्याबद्दल कुटी प्रमुख म्हणुन भरत पवार यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, दवणगाव येथील सरपंच श्री. रवी नागरगोजे, उपसरपंच श्रीमती पाटील, नागरीक डॉ. मोरे सर तसेच सर्व रा.से.यो. स्वयंसेवक व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष कदम, सुत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. सुनीता सांगोले तर आभार प्रदर्शन कार्यक्रामाधिकारी डॉ. मच्छिंद्र खंडागळे यांनी केले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, कार्यक्रामधिकारी प्रा. विलास कोमटवाड व प्रा. सुरेश क्षीरसागर, सेवक श्री. पुरुषोत्तम गोदाम आदीनी परिश्रम घेतले.