जागतिक आरोग्य दिवस हा मानवाला आरोग्याची जाणीव करून देणारा – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली. या दिवशी मानवाने आपल्या आरोग्याची काळजी जाणीवपूर्वक सातत्याने केली पाहिजे. मानवाचे आरोग्य चांगले असेल तरच त्याला आपल्या आयुष्यातील लक्ष पूर्ण करता येतात अन्यथा कोणीही व्यक्ती तो पूर्ण करू शकत नाही, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा भाजपा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते जेएसपीएम संचलित एमआयडीसी, कळंब रोड, लातूर येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्यावतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपात बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रमेश भराटे, जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, समन्वयक विनोद जाधव, प्राचार्य डॉ.शैलेश कचरे, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्या शिरीन सॅमसन मॅडम, उपप्राचार्य महम्मद ऐजाज नवाज, प्राचार्य संदीप पांचाळ, प्रा.अजहर सर, प्रा.नसरीन बानू मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले, मानवाचे शरीर सुदृढ राहण्यासाठी राष्ट्रभक्त मुरारी बापूच्या सूत्रांचे अनुकरण करावे. ज्यामध्ये आचार, विचार, आहार, अंगतविहार व उच्चार शुध्द असले पाहिजे. याबरोबरच आंतकरणामध्ये सतत सकारात्मक व चांगले विचार असल्यास मानवाची माणसिक, वैचारिक व शारीरिक प्रकृती सदृढ राहील. वैद्यकीय क्षेत्र हे अत्यंत व आदर्श व पवित्र आहे. त्याची जपवणूक आपण केली पाहिजे. कुठलाही पेशंट आई-वडिलानंतर डॉक्टरची पूजा करतो. अशा विश्वासाला तडा जाईल अशी कृती आपण कदापि करू नये लातूरसारख्या शहरामध्ये वैद्यकीय पॅटर्न मोठ्या प्रमाणात गाजलेला आहे. लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉ.भालचंद्र, डॉ.ईश्वर राठोड, डॉ.सारडा यांच्यासारखी नावे समोर येतात. सध्याही अनेक डॉक्टर्स निष्ठेने काम करतात परंतु त्यांनी डॉक्टर्स म्हणून किती दिवस काम केले या पेक्षा त्यांनी काय काम केले? किती चांगले केले? याला महत्त्व आहे. त्यामुळे या दृष्टिने महाराष्ट्र नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी, त्यांनाही यश निश्चित मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फ्लॉरेन्स नाईटअँगल यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीन मॅडम यांनी केले. या कार्यक्रमातच घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीरात 168 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच पोस्टर प्रझेंटेशन, पॅनल डिस्कशन या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अब्दूलगालिब शेख यांनी केले तर आभार प्रा.अजहर सर यांनी मानले.
मदतीसाठी हाक मारा मी, सदैव सेवेसाठी तयार आहे डॉ.रमेश भराटे
जगामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या सुचनेनुसार 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचे मिटींगमध्ये ठरविण्यात आले. जगातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोणातून हा दिवस निवडण्यात आल्यामुळे या दिवसाचे वेगळेपणे सिध्द झालेले आहे. सध्या हृदयरोग, कर्करोग, दमा, उच्च रक्तदाब याचे प्रमाण वाढत आहे. तसेच इतर सांसर्गीक व असांसर्गिक रोगाचे प्रमाण वाढत आहे. कोरोनासारख्या संकटामध्ये सेवा देण्यासाठी केरळचा स्टाफ महत्त्वाचा असे प्राधान्य देण्यात आले. यावरचही चिंतन करणे गरजेचे आहे. आपल्याकडील कर्मचार्यातही वेळेच भान, कार्यातील चिकाटी व नम्रपणा या गोष्टी आहेत. याकडे लक्ष देवून स्टाफ बद्दलच्या दृष्टिकोणातही बदल करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आपण या कॉलेजच्या माध्यमातून नर्सिंगमधील पदवी, पदव्युत्तर पदवी व इतर कोर्सेस सुरु करा. चौफेर प्रगती होईल. त्यामुळे काही गरज पडल्यास आरोग्य विभागाचा घटक समजून मला मदतीसाठी केव्हाही हाक मारा मी आपल्या मदतीसाठी सदैव तयार आहे. असे भावनीक आवाहन डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.रमेश भराटे यांनी केले.