मुली व महिलांना दहा दिवस मोफत कराटे प्रशिक्षण
यवतमाळ (प्रतिनिधी) : देशासह राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून या घटनांना आळा बसावा म्हणून भाजपा स्थापना दिनानिमित्त महिलासह मुलींना स्वतःचे संरक्षण करता यावे यासाठी १० दिवस मोफत कराटे प्रशिक्षणाचे आयोजन भाजप महिला शहर अध्यक्ष सौ. उषाताई खाटे व माजी नगरसेविका सौ.नीताताई केळापुरे यांनी सुयोग नगर बाल उद्यान येथे आयोजित केले आहे.
या मोफत कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवार (दि.६) रोजी कार्यक्रमाच्या उद्घाटिका भाजप जिल्हाध्यक्षा सौ.मायाताई शेरे यांच्या हस्ते भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून सदर प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमावेळी मार्गदर्शन करताना माया शेरे म्हणाल्या की, आजच्या काळात सर्व मुलीना कराटे शिकण्याची खूप आवश्यकता आहे. मुलीवर अनेक अत्याचार होत असल्याचे आपणास वृत्तपत्रातून बघायला मिळत असून सध्या विकृती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे स्वतःच्या संरक्षण करण्यासाठी आणि कोणी चुकीचे वागत असेल अश्या व्यक्तींना कराटे प्रशिक्षण घेऊन धडा शिकविता येईल यासाठी कराटे प्रशिक्षण प्रत्येक महिला व मुलीने घ्यावे असे अहवान यावेळी केले.सदर प्रशिक्षण शिबिरात माजी नगरसेविका सौ.नीता केळापुरे यांच्या सहकाऱ्याने अनेक मुलींनी प्रशिक्षणात सहभाग नोंदविला आहे.तसेच या दहा दिवसाच्या मोफत कराटे प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक म्हणून श्री आनंद भुसारी, हर्षल घुगे, डंबे मॅडम, प्रणव डोईजड, माधुरी जाधव, सुनिता सूर्यवंशी हे प्रशिक्षण देणार आहेत. तर या मोफत प्रशिक्षण शिबिराच्या वेळी भाजप महिला महामंत्री सौ. वैशाली खोंड,शहर उपाध्यक्ष भास्कर भाऊ केळापुरे, संतोष डोईजड, मनोज इंगोले, डॉ. दीपक शिरभाते, प्रफुल्ल वाकुलकर, महिला शहर सरचिटणीस सौ. मीनल पांडे, सौ. अर्चना वाकुलकर,सौ सुनीता सूर्यवंशी, सौ.कविता देशमुख, सौ. अनुराधा ढाकुलकर, यावेळी उपस्थित होते तर कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.शिवानी हरसूलकर यांनी केले तर आभार अनिता जगताप यांनी मानले.