घरातून ९६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला

घरातून ९६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला

पिंपरी (रफिक शेख) : खिडकीत ठेवलेल्या चावीने दरवाजाचे कुलूप उघडून चोरट्याने घरातून ९६ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना २६ फेब्रुवारी ते ६ एप्रिल या कालावधीत जुनी सांगवी येथे घडली. याप्रकरणी लक्ष्मी सचिन कटबू (वय २३, रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली. त्यानुसार, २६ फेब्रुवारी रोजी फिर्यादी यांच्या भावाच्या घरी पूजेचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या वेळी घातलेले दागिने त्यांनी व्यवस्थित ठेवले. त्यानंतर ६ एप्रिल रोजी फिर्यादी काम करत असलेल्या विभागाची साधू वासवानी चौक, पुणे येथे बैठक असल्याने त्यांनी दागिने घालण्यासाठी कपाट उघडले असता दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले. यात एकूण ९६ हजारांचे दागिने लंपास झाले. दरम्यान, फिर्यादीने त्यांच्या घराच्या खिडकीत ठेवलेली चावी घेऊन चोरट्याने घराचा दरवाजा उघडला.

About The Author

error: Content is protected !!