महिलेची ऑनलाइन केली फसवणूक

महिलेची ऑनलाइन केली फसवणूक

पिंपरी (प्रकाश इगवे) : जुना फ्रीज आणि सोफासेट खरेदी करण्याच्या बहाण्याने महिलेची ९५ हजारांची ऑनलाइन फसवणूक केली. वाकड येथे सोमवारी (दि. ४) सकाळी सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडली. श्वेता रोहित देशमुख (वय ३८, रा. वाकड) यांनी याप्रकरणी मंगळवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मोबाइलधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीने त्यांचा जुना फ्रीज आणि सोफासेट ब्रिकी करण्यासाठी ओएलएक्सला जाहिरात टाकली. ही जाहिरात पाहून आरोपीने फिर्यादीला मेसेज केला. तसेच वस्तूंचे १९ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केल्याचा स्क्रीनशॉट टाकला. त्यानंतर फिर्यादीने काहीही न करता त्यांच्या खात्यातून ९५ हजारांचे ऑनलाइन ट्रान्झेक्शन करून फसवणूक केली.

About The Author