विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊनच ऑनलाईन अर्ज भरावा विश्वजीत मुंडे यांचे विद्यार्थी व पालकांना आवाहन

विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊनच ऑनलाईन अर्ज भरावा विश्वजीत मुंडे यांचे विद्यार्थी व पालकांना आवाहन

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी MBBS,BDS,BAMS,BHMS,BUMS,BoTH,BPTH आणि B.Sc. Nursing या आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस पात्र होण्यासाठी शैक्षिणक वर्ष २०२२-२३ साठी नॅशनल टेस्टिंग एजंसी मार्फत National Eligibility- cum-Entrance Test [(NEET (UG)] – 2022 १७ जुलै रोजी होणार आहे यासाठी ०६ एप्रिल २०२२ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून ०६ मे २०२२ रात्री ११.५० PM पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नीट युजी २०२२ नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रान्स टेस्ट युजी २०२२ ही १३ भाषेमध्ये घेतली जाणार आहे.नीट फॉर्म मध्ये अपलोड करण्यासाठी लागणारी पुढीलप्रमाणे ओरिजिनल डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी सोबत बाळगणे आवश्यक आहे. पासपोर्ट व पोस्टकार्ड (4×6) फोटो विथ व्हाईट बॅक ग्राऊंड पूर्ण नाव व फोटो काढलेला दिनांक,विद्यार्थ्याची सही(व्हाईट पेपर वर ब्लॅक पेन ने केलेली),विदयार्थ्याचा डाव्या व उजव्या हाताच्या सर्व १०बोटांची व्हाईट पेपर वर ठसे,उपलब्ध असेल तरसेंट्रल फॉरमॅट मधील कॅटेगरी सर्टिफिकेट (SC/ST/OBC/EWS),PwD सर्टिफिकेट, १०वी ची मार्कशीट व सनद (ज्यावर जन्म दिनांक लिहिलेला असावा.).तसेच नीट फॉर्म मध्ये माहिती भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स(ओरिजिनल, झेरॉक्स किंवा मोबाईल मध्ये फोटो असेल तरी चालेल.) आधार कार्ड, १० वी मार्कशीट,११ वी मार्कशीट,१२वीमार्कशीट (रिपीटर साठी),१०,११,१२ वी शाळा व कॉलेजचे नाव,पत्ता व पिन कोड, अनुदानित किंवा विनाअनुदानित इत्यादी माहिती आवश्यक आहे.अर्ज नोंदणी साठी 1) General :- Rs.1600/-2) General-EWS/OBC-NCL :- Rs.1500/- 3) SC/ST/PwD/Third Gender :- Rs.900/- याप्रमाणे ऑनलाईन शुल्क आकारण्यात आले आहे. तेव्हा विद्यार्थी व पालकांनी योग्य मार्गदर्शनानेच आपला अर्ज भरावा असे आवाहन सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे संचालक विश्वजीत मुंडे यांनी केले आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये होणाऱ्या सर्व मेडिकल व इंजिनीरिंग प्रवेश प्रक्रियेच्या Counseling रजिस्ट्रेशन सुरभी प्रवेश प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र येथे सुरु झाले आहे त्यासाठी आता परळी व परिसरातील विद्यार्थ्यांना लातूरला जायची गरज नाही याची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. लातूरप्रमाणे परळी शहरात सुरु झालेल्या सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्रास बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. लातूर मधील सुप्रसिद्ध ऍडमिशन मेड इझी चे संचालक श्री.सचिन बांगड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेले हे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र विद्याथी व पालकांसाठी अतिशय उपयोगी ठरत आहे. अधिक माहितीसाठी संचालक विश्वजीत मुंडे (९१५८३६३२७७) सर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!