योग साधना काळाची गरज – कलावती भातांब्रे

योग साधना काळाची गरज - कलावती भातांब्रे

अहमदपूर (गोविंद काळे) : २१ वे शतक हे स्पर्धेचे, ताणतणावाचे, पालकांच्या अपेक्षेचे, फास्टफुडचे आहे. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगासने , प्राणायाम, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार नियमित केले पाहिजेत असे प्रतिपादन योग शिक्षिका जिल्हा संवाद प्रभारी कलावती भातांब्रे यांनी केले. संत ज्ञानेश्वर विद्यालयात दि.4/4/2022 पासून चार दिवसीय योगा प्राणायाम शिबिर महिला पतंजली योग समितीच्या वतीने घेण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ योग मार्गदर्शक शिवमुर्ती भातांब्रे, योग शिक्षिका जिल्हा संवाद प्रभारी कलावती भातांब्रे, तालुका प्रभारी पुष्पा ठाकूर यांनी विद्यार्थ्यांनकडून योगा प्राणायाम चे प्रात्यक्षिक करून घेतले. शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक शिवमुर्ती भातांब्रे यांनी विद्यार्थ्यांना जनरल प्रश्न विचारून त्यांचे कौतुक केले व त्यांना बक्षीस म्हणून चिंतन कॅलेंडर देऊन त्यांचा सत्कार, गौरव केला .यावेळी मार्गदर्शक शिवमुर्ती भातांब्रे सर, योग शिक्षिका कलावती भातांब्रे, पुष्पा ठाकूर यांचा विद्यालयाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. भातांब्रे सरांनी सूर्यनमस्कार, सूक्ष्म व्यायाम प्रकार ,प्राणायाम इत्यादी बाबत सखोल असे मार्गदर्शन केले. व दुसरं सर्वकाही विसरा पण आई वडिलांना विसरु नका अशी शपथ उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दिली. कलावती भातांब्रे पुढे बोलताना म्हणाल्या की, ही शाळा प्रेम, ज्ञान व शक्ती यावर अधिक भर देणारी शाळा आहे. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास, शक्ती म्हणजे शरीराचा आरोग्याचा विकास. या शिबिरात पुढे पुष्पा ठाकूर यांनी विद्यार्थ्यांकडून सुपर ब्रेन योगा करून घेतला. यावेळी सर्व विद्यार्थी अतिशय उत्साहाने योगा प्राणायाम करत होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी राज्य आदर्श शिक्षिका तथा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव श्रंगारे सह शिक्षक वृंद उपस्थित होते. सदरील शिबिराचे सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार संगीता आबंदे यांनी मानले. शेवटी पसायदान घेऊन शिबिराची सांगता करण्यात आली. शिबीर यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author