रौप्यमहोत्सवी वर्षात भाऊसाहेब सहकारी बँकेचा नफा १ कोटी व एनपीए ०.८२ टक्के
उदगीर (एल. पी. उगीले ) : येथील भाऊसाहेब सहकारी बँक लि., उदगीर या बँकेस मार्च २०२२ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात रु.१ कोटी १ लक्ष इतका नफा कर तरतुद करून निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष भगवानराव रामचंद्रराव पाटील तळेगांवकर यांनी दिली.
मार्च २०२२ अखेर बँकेचे भाग भांडवल रु.३५५.९१ लक्ष एवढे आहे. बँकेचे राखीव व ईतर निधी रु.६२२.२१ लक्ष
असून ठेवी रु.७३९०.८९ लक्ष व कर्जे रु.५०००.८४ लक्ष इतके झाले आहेत. तसेच गुंतवणूक रु.२९९८.५९ लक्ष असून सर्व
रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे व योग्य आहेत. महत्वपूर्ण बाब म्हणजे बँकेचा ग्रॉस एन.पी.ए. ४.६०% व नेट एन.पी.ए. ०.८२%
इतका आहे. बाजारातील मंदीच्या काळातही ग्राहकांनी दिलेल्या सहकार्यामुळे बँकेस उद्दिष्ट साध्य करणे शक्य झाले. हे
बँकेच्या अभिमानास्पद असल्याचे भगवानराव पाटील यांनी सांगितले. बँकेच्या आर.टी.जी.एस./ एन.ई.एफ.टी., सेवा व बँकेच्या विविध ठेव योजना व किमान
व्याजदराने दिलेले कर्जे यांचा लाभ बँकेचा ग्राहक सभासद वर्ग घेत असून त्यांच्या अलोट विश्वासामुळे आज बँकेची
रौप्यमहोत्सवी महोत्सवी वर्षात प्रगती दिसून येते. येणाऱ्या पुढील काळात बँकेने ग्राहकांना डिजिटल पद्धतीने सेवा देण्याचा
मानस असल्याचेही बँकेचे अध्यक्ष भगवानराव पाटील तळेगावकर यांनी सांगितले. तसेच बँकेच्या प्रगतीसाठी
बँकेचे संचालक मंडळ, सभासद, ग्राहक, व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी आभार मानून बँकेच्या प्रगतीसाठी या
पुढेही असेच सहकार्य कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव सोनकांबळे, मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत कुलकर्णी, सरव्यवस्थापक व्यंकट पाटील व अधिकारी शिवाजी एस. पाटील,
शिवाजी बी. पाटील आदी उपस्थित होते.