अहमदपूरात काँग्रेसचे महागाई मुक्त भारत आंदोलन

अहमदपूरात काँग्रेसचे महागाई मुक्त भारत आंदोलन

अहमदपूर (गोविंद काळे) : मोदी सरकारच्या विरोधात महागाई मुक्त भारत आंदोलन येथील तळेगाव रोड येथे ओम गँस एजन्सीच्या समोर काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. यावेळी आंदोलनात दिवसेंदिवस होत असलेली इंधन दरवाढ ही जनतेला लुटणारी असून मोदी सरकार जनतेला वेठीस धरून लुट करत आहे. अशा घोषणा देत पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात महागाई मुक्त भारत आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलनात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर व कच्चा तेलाच्या भावात भरमसाट वाढ झाल्यामुळे जनता व्याकूळ झाली आहे. आदी घोषणा देत या दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करत जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी अहमदपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अँड. हेमंत पाटील, लातूर जिल्हा सरचिटणीस साब महाजन, जिल्हा नियोजन समिती सदस्य चंद्रकांत मद्दे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सिराजोद्दीन जागीरदार, माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद मुळे, शहराध्यक्ष विकास महाजन, अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष प्रकाश सासाणे, सद्दाम पटेल, हंबीरे अनुसूचित जाती अहमदपूर शहराध्यक्ष प्रकाश कदम, मोहन पांचाळ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author