अहमदपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा !

अहमदपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा !

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर झालेली दगडफेक व निदर्शने अत्यंत निंदनीय आहेत. झालेल्या या प्रकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आज अहमदपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. या निंदनीय कृत्यापाठी नेमका कोणाचा हात आहे याचा तपास करून राज्यातील पोलीस दलाने दोषींवर कारवाई करायला हवी, अशी मागणी या माध्यमातून मी करत आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड.टी.एन कांबळे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महेश अर्बन बँक उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, उपसभापती तुकाराम पाटील, शहराध्यक्ष अझहरभाई बागवान, महेश बँक संचालक डी.के जाधव, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, युवक तालुका अध्यक्ष दयानंद पाटील, विद्यार्थी तालुका अध्यक्ष विनायक शिंदे, किसान तालुका अध्यक्ष विनायकराव पाटील चोबळीकर, प्रदेश सदस्य सोमेश्वर कदम, तालुका उपाध्यक्ष तानाजीराजे, तालुका उपाध्यक्ष सुर्यकांत चिघळे, शिवसेना नगरसेवक संदीप चौधरी, काँग्रेस नगरसेवक रवी महाजन, नगरसेवक अभय मिरकले, मा.सरपंच गोपीनाथ जायभाये, मा.नगरसेवक दस्तगीर भाई शेख, ओबीसी तालुका अध्यक्ष विष्णू आलापुरे, नगरसेवक ॲड.अलीम सय्यद, नगरसेवक भैयाभाई सय्यद, अशोक सोनकांबळे, सय्यद इलियास, फिरोज शेख, अफरोज शेख, बाळासाहेब बेडदे, गोपाळ कानवटे, वेंकट वंगे, संग्राम गायकवाड, अमर मोरे, संभाजी चोपणे, किरण बरमाळे, राहुल तेलघाणे, अनिस कुरेशी, सिद्धू पनघटे, बालाजी पवार, अमोल पौळ, सुनील डावरे, दिनेश काडवदे, अझहर सय्यद, अहमद तांबोळी, अरबाज पठाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author