खा.शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा चाकूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध

खा.शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा चाकूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध

चाकुर (गोविंद काळे) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानाबाहेर शुक्रवार दि. ८ एप्रिल २०२२ रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लारुपी आंदोलन करून लोकशाहीला काळीमा फासली आहे. या घटनेचा निषेध करीत चाकूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर निषेधाच्या घोषणा देवून निषेधाचे निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की ,एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत महा विकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी व नेत्यांनी चर्चेचा मार्ग नेहमीच खुला ठेवला होता. त्यातच मा. मुंबई न्यायालयाने निकाल जाहीर केल्यामुळे संप मिटला असावा अशी सर्वांची अपेक्षा असताना खा. पवार साहेब यांच्या घराबाहेर काल आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाचा चाकूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला असून या बाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष भानुदासराव पोटे, चाकूर नगरपंचायतचे गटनेते करीमसाहेब गुळवे, शहराध्यक्ष गणेशराव फुलारी, चाकूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक राधाकिशन तेलंग, नगरसेवक इलियास सय्यद, शिवदर्शन स्वामी, यशवंतराव जाधव, दयानंद सुरवसे, माजी पंचायत समिती सदस्य सिध्देश्वर शिंदे, सिद्धेश्वरआप्पा अंकलकोटे, डॉ.अब्दुल शेख, शिवप्रसाद शेटे, अॕड. संतोष गंभिरे, अॕड.धनंजय सुर्यवंशी, युनूस सय्यद, रामदास घुमे, बालाजी भोरे, विष्णुकांत खेरडे, नागनाथ येरनाळे, शरद जाधव, युवक तालुकाध्यक्ष राहूल सुरवसे, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष समाधान जाधव, संदीप शेटे, अजित शेख, मौलाना मतीन गुळवे, तौफिक शेख आदीसह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author