अहमदपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण.

अहमदपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण.

अहमदपूर (गोविंद काळे) : महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त अहमदपूर शहरातील विराट अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील पंचशील नगर, बौद्ध नगर ,शहीद गौतम वाघमारे चौकात माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सरस्वतीबाई कांबळे, डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, गोविंदराव गिरी, रिपाइंचे नेते अरुण वाघबंर, माजी उपनगराध्यक्ष कलीमोदीन अहमद, वसंत कदम, प्रशांत जाभाडे, डॉ.मधुसुदन चेरेकर, अँड. निखिल कासनाळे, अँड. किशोर कोरे, लक्ष्मीकांत कासनाळे, केदार काडवादे,नागनाथ गायकवाड, मेघराज गायकवाड, बालाजी पारेकर, यांच्या सह अनेकजण उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!