जिल्हा बँकेने खरेदी केलेल्या ए.टी.एम मोबाईल कॅश व्हैन चे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते पूजन
जिल्ह्यात लवकरच ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार – माजी मंत्री दिलीपराव देशमुख
लातूर (प्रतिनिधी) : जे जे नव ते लातूरकरांना हवं लोकनेते राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब नेहमी म्हणत असायचे त्यांच्याच आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यात जिल्हा बॅंकात दुसऱ्या क्रमांकावर तर मराठवाडा व विदर्भात पहिल्या स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा बँकेच्या वतीने लवकरच ग्राहकांच्या सेवेत ए. टी .एम मोबाईल कॅश व्हन द्वारे ग्राहकांना सेवा देण्यात येणार असून त्यासाठी शुक्रवारी दोन गाड्या बँकेने खरेदी केलेल्या आहेत त्या नवीन मोबाईल कॅश व्हैंन चे पूजन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी बॅंकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्यात आले लवकरच ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे.
लातूर जिल्हा बँकेच्या जिल्यात 120 शाखा सुरू असून जवळपास 500 गावात जिल्हा बँकेचा व्यवहार आहे शेतकरी सभासद, शिक्षक पतसंस्था, फेडरेशन, शासकीय व्यवहार, संजय गांधी निराधार अनुदान योजना, सामान्य माणसाचे व्यवहार ग्रामीण भागात याच बॅंकेतून होत असतो त्यामुळे सर्वांना नेहमीच आपली जिल्हा बँक वाटते ग्राहकांना सेवा देण्यात राज्यात आधाडी वर असून पीक विमा, अनुदान योजना ग्रामीण भागात घरपोच सेवा देणारी लातूर जिल्हा बँक म्हणून राज्यात या बँकेने नावलौकिक मिळवला आहे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रशासन, पारदर्शक कारभार या बँकेने आतापर्यंत ऑनलाईन सेवा, ए टीम , संगणक सिस्टीम ने बँकेचा व्यवहार सुरू आहे.
आता बँकेने गतवर्षी झालेल्या बैठकीत घोषणा केल्याप्रमाणे जिल्यातील लोकांना जलदगतीने पैसे मिळावेत भरता यावेत यासाठी आता मोबाईल कॅश व्हैन द्वारे ग्राहकांना सेवा देण्यात येणार आहे त्यासाठी लवकरच ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार आहे त्या कॅश व्हैन चे पूजन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन एस आर देशमुख, संचालक संभाजीराव सुळ, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, वितरक गर्जे मोटार चे मुकेश गर्जे, बॅंकेचे अधिकारी सुनील पाटील, शरद मुळे, मारूती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शामराव भोसले, माजी उपाध्यक्ष उदयसिंह देशमुख, माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, बाळासाहेब कदम, प्रा.शशी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
दिलीपराव देशमुख यांनी केली मोबाईल कॅश व्हैन ची केली पाहणी
यावेळी नव्याने आलेल्या मोबाईल कॅश व्हन ची गाडीत बसून पाहणी केली ए.टी.एम.बसवायचे यंत्र सामुग्री, याची माहिती घेतली काही सूचना केल्या अंतर किती आहे याची माहिती घेतली.