जागतिक स्पर्धेत यशस्वी होणारे विद्यार्थी घडविणारी जेएसपीएम संस्था – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : जागतिक पातळीवरील शिक्षणपध्दतीमध्ये डिग्री बरोबर टॅलेंट, विविध विषयाचे ज्ञान देवून त्याला तयार केले जाते. त्याच पध्दतीने जेएसपीएम लातूर संस्थेचे स्वामी विवेकानंद इंट्रिग्रेशन सी.बी.एस.ई.स्कूलच्या विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कार्य प्राचार्य डॉ.सचिदानंद जोशी (निवृत्त प्राचार्य मिलेट्री स्कूल छत्तीसगड) हे करीत आहेत. त्यामुळे या शाळेचे विद्यार्थी जागतिक स्थरावर चियांक फ्लॅड खेळामध्ये व इतर खेळामध्ये स्पर्धात्मक ऑलिम्पीयाडमध्ये मॅथ व सायन्समध्ये गुणवत्तेत आलेले आहेत. शाळेने नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून विद्यार्थ्यांना आधुनिक स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी तयार केले. त्याबरोबरच भारतीय मुल्य व अधात्माची शिकवण देऊन त्यांना एक चांगले भारतीय तरूण म्हणून काम करण्याचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलच्यावतीने आयोजित पालक-विद्यार्थी मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी जेएसपीएम संस्थेचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, समन्वयक विनोद जाधव, प्राचार्य सचिदानंद जोशी, उपप्राचार्य सौ. आशा जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, आपल्या देशाची लोकसंख्या जगात दुसर्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक हुशार तरूण आपल्या देशात आहेत. तरीही सुशिक्षीत बेकारांची संख्याही मोठी आहे. याचे कारण म्हणजे आपल्याकडील शिक्षणपध्दती त्यामुळे किमान कौशल्यावर आधारीत शिक्षणपध्दतीचा वापर करण्याचा गरज निर्माण झालेली आहे. केंद्र शासनाने नवीन सी.बी.सी.एस.शिक्षणपध्दती सुरू केली आहे. ती योग्य असून त्या शिक्षणपध्दतीला सपोर्ट करण्याचे काम आपण या संस्थेच्या माध्यमातून करीत आहोत. संस्थेच्या ब्रिदवाक्यानुसार अध्यात्म, विज्ञान व्यावसायीकतेवर आधारीत शिक्षणाद्वारे तेजस्वी विद्यार्थी निर्माण करावेत. कोरोणाच्या संकटाच्या काळात संशोधन करून ऑनलाईन शिक्षणाद्वारे आपण कोरोणाशी लढा देण्याचे काम केले असल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व सरस्वतीच्या देवीच्या प्रतिमेचे पूजन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ज्युनियर आय.एस.एस.कॉम्पीटिशेनमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या गुरूडिया होडाडे व तिरूमला होडाडे यांचा व विविध स्पर्धेतील 21 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सचिदानंद जोशी यांनी केले तर सुत्रसंचलन अंबादास तोडकर यांनी केले तर आभार डॉ.आशा जोशी यांनी मानलेे. यावेळी मुक्तार शेख, हामजा पठाण, अजीम शेख, शिवकन्या चव्हाण,दिपाली चव्हाण श्वेता चव्हाण, नम्रता पाटील, यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नवीन शिक्षणपध्दती देशाला महासत्ता बनवेल
भातरामध्ये तरूणांचा बुध्यांक जागतिक स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट आहे. तरूणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच भारताचा चेन्नई येथील पिलाई व्हॉट्स अॅप ग्रुपचा सी.ई.ओ. बनला असून त्याला जगात सर्वाधिक वेतन आहे. तामिळनाडूची कमला हैरीस ही तरूणी अमेरिकेची उपराष्ट्रपती व अनेक भारतीय अमेरिका व इतर देशात शासकीय उच्चपदावर आहेत. हा भारताचा गौरव आहे. भारताच्या शिक्षणपध्दतीमध्ये बदल करून मोदी सरकारने सी.बी.सी.एस.शिक्षणपध्दती आणली आहे. त्यामुळे संशोधन, प्रॅक्टिकल सर्व विषयाचे ज्ञान घेण्याची प्रक्रिया वाढून त्यावर अध्यात्माचेही संस्कार दिले जाणार आहे. त्यामुळे भारत जगामध्ये महासत्ता बनेल, असेही माजी आ.कव्हेकर म्हणाले.
