सिंदगी खुर्द येथे वर्धिनी आम सभेचे आयोजन

सिंदगी खुर्द येथे वर्धिनी आम सभेचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सिंदगी खुर्द येथे दि 29 जाने रोजी वर्धिनी आम सभेचे आयोजन करण्यात आले होते या आम सभेमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना विषयी सखोल माहिती देण्यात आली तसेच स्वयं सहाय्यता समूह, समूहाचे जीवन चक्र, समूहाची कार्यपद्धती, समूहात आल्यावर सामान्य कुटुंबाचा विकास कसा साधला जातो, दशसुत्री तसेच समूहात आल्यावर विविध योजनेचा लाभ कसा प्राप्त होतो इत्यादी विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली.

सदरील आमसभेला सौ. गंगासागर जाभाडे सभापती पंचायत समिती अहमदपूर,नारायणराव देवकत्ते सरपंच सिंदगी खुर्द,किसनराव सोडगीर मा.सरपंच सिंदगी खुर्द, तुकाराम शेवरे उप सरपंच सिंदगी खुर्द, नारायण करांडे प्रभाग समन्वयक खंडाळी, लक्ष्मण डुकरे प्रभाग समन्वयक अंधोरी,खंडेराव चीदगीर चेअरमन शिंदगी खुर्द, साहेबराव करांडे चेअरमन मांगदरी आदी सह सर्व वर्धिनी ताई यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!