मराठी माणसाचा अभिमानाचा, अस्मितेचा आणि स्वातंत्र्याचा दिवस – गणेश हाके

मराठी माणसाचा अभिमानाचा, अस्मितेचा आणि स्वातंत्र्याचा दिवस - गणेश हाके

अहमदपूर (गोविंद काळे) : १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. त्याचप्रमाणे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीसाठीदेखील ओळखला जातो. तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्रात अशा थोर विभूतिंचा जन्म झाला ज्यांनी या राष्ट्राला दिशा दिली.असे मत बालाघाट तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात गणेश हाके यांनी मांडले. यावेळी संचालक कुलदीप हाके, शिवालीका हाके,उपप्राचार्य स्वप्नील नागरगोजे, स्कुलच्या प्राचार्या ऋत चक्रणारायानं आय टी आय चे प्राचार्य मदन आरदवाड, संग्राम कोपणार, कालिदास पिटाळे, महेश सूर्यवंशी, सुहास दहीटनकर, गणेश एमगीर, भरत कानवडे, शुभांगी सूर्यवंशी, सिद्धू मासुळे, विजय पांचाळ, मंगेश चव्हाण, श्रीराम कागणे, बालाजी लवटे, सतीश केंद्रे आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!