९७ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर: सरपंचपदी दिसणार नवीन चेहरे
अहमदपूर तालुक्यात ४८ ग्राम पंचायतवर महिलाराज
अनेकांना धक्का तर काहींना लॉटरी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी २९ जानेवारी रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे काढण्यात आली.तालुक्यातील ९७ सरपंचपदाचे आरक्षण २९ जानेवारी जाहीर झाले. संसाराचा गाडा चालविणाऱ्या महिलावर्गा साठी ५० टक्के आरक्षणानुसार सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीतही बोलबाला दिसून आला. अनेक ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी सरपंचपद आरक्षित झाल्याने सत्तेच्या चाव्या आता गृहलक्ष्मीच्या हाती येणार हे निश्चित झाले आहे. तालुक्यातील ९७ ग्रा.पं.पैकी ४९ ग्रा.पं.मध्ये येत्या ५ वर्षात महिला सरपंच विराजमान होणार आहेत. दरम्यान शुक्रवारी २०२० ते २०२५ या ५ वर्षांच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रा.पं.च्या सरपंच आरक्षणाची सोडत उपविभागिय अधिकारी प्रभोदय मुळे, आणि तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात २७ महिला व २२ पुरुषांना सरपंच पदाची संधी मिळणार आहे.यानंतर पुढच्या टप्प्यात होणाऱ्या उर्वरित ४९ ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. या सोडतीतून तालुक्यातील एकूण ४८ महिला सरपंचांना संधी मिळणार आहे.त्यात ०९ ग्रामपंचायतींवर एस्सी महिला सरपंच विराजमान होणार आहेत तर दोन गावांत अनुसूचित जमातीच्या सरपंचांना ०२ महिला सरपंचाना संधी मिळणार आहे.ना.मा.प्र. महिला १३, सर्वसाधारण महिला २४, अनु. जाती १०, ना.मा प्र.१३, सर्वसाधारण २५,अनु.जमाती०१ असे ९७ ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत झाली आहे. त्यातील ४९ ग्रामपंचायतीमध्ये अनु. जाती०४ महिला, अनु.जमाती ०१ महिला, ना.मा. प्र.०७ महिला, सर्वसाधारण मध्ये १५ महिला सरपंच तर अनुसूचित जाती ०३, ना.मा. प्र.१०, सर्वसाधारण मधून ०९ जण सरपंच पदावर विराजमान होणार आहेत. या आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहात सर्वांच्या समोर लहान मुलांकडून चिठ्ठी काढण्यात आले आरक्षण चिट्ठी काढून जाहीर होताच कार्यकर्ते जल्लोष करीत होते.
अनेकांचे मनसुबे धुळीस
तालुक्यातील ग्रा.पं. निहाय आरक्षण मध्ये अनेक इच्छुकांना धक्का बसला असल्याने येणाऱ्या ५ वर्षातील निवडणुकीत नवीन चेहरे सरपंचपदी विराजमान होण्याची चर्चा या आरक्षणा नंतर राजकीय पटलावर रंगू लागली आहे.आरक्षण सोडत वेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अनेक जणांनी भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आतापासूनच दंड थोपटल्याची चर्चा या दरम्यान सुरू होती. मात्र आरक्षण बदलल्याने इतर चाचपणी सुरूवात झाली आहे.