अजित पाटील कव्हेकरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अजित पाटील कव्हेकरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : मांडेज क्‍लासेसच्यावतीने इयत्ता 10 वी सी.बी.एस.सी. बोर्ड परिक्षेतील विद्यार्थ्यांचा सत्कार जेएसपीएमचे कार्यकारी संचालक तथा भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी डॉ.छायाताई ढेले, जयक्रांती अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोरोेबा खुरपे, प्रोफेशनल टिचर्स असोशियशनचे राज्याध्यक्ष प्रा. विकास कदम, मांडेज क्‍लासेसचे संस्थापक सुभाष मांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रमुख मान्यवरांचा सत्कार वृक्ष भेट देवून करण्यात आला. तसेच 10 वी सी.बी.एस.ई. पोद्दार स्कूलमधून द्वितीय क्रमांक मिळविलेल्या ऐश्‍वर्या प्रमोद पाटील, शांतीनिकेतन सी.बी.एस.सी. स्कूलमधील पार्थ वाघोलीकर व विशेष प्राविण्य मिळविलेल्या हर्ष सारडा, द्विग्विजय शेटे, रूपेश हेड्डा, तेजस खानापुरे, व होमीभाभा बाल वैज्ञानिक परिक्षेत सिल्व्हर मेडल मिळविलेल्या सिध्देश मांडे व इतर गुणवंत विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि.सागर मांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविशंकर कोेरे यांनी केले. तर आभार प्रा.मनोरमा मांंडे यांनी मानले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!