बोकनगावच्या परिवर्तन ग्रामविकास पॅनलतर्फे माजी आ.शिवाजीराव पाटीलकव्हेकरांचा सत्कार

बोकनगावच्या परिवर्तन ग्रामविकास पॅनलतर्फे माजी आ.शिवाजीराव पाटीलकव्हेकरांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोकनगाव येथील ग्रामपंचायतीअंतर्गत भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मधुकर एकनाथ पाटील, विजयकुमार विठ्ठलराव शिंदे, बालाजी नरसिंग दाताळ, संभाजी रावसाहेब दाताळ, बंडू विठ्ठलराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे 9 पैकी 8 उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजय झाले.त्यामुळे विजयी उमेदवारांच्या उपस्थितीत भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांचा मजगे नगर येथील कैलास निवासस्थानी पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी विजयी उमेदवार किशोर पांडूरंग दाताळ, अंत्येश्‍वर उध्दव दाताळ, शामराव रावन सुर्यवंशी, विलासराव रावन सुर्यवंशी, दयानंद स्वामी, आत्माराम शिवाजी जाधव यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी सर्व विजयी उमेदवारांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच बोकणगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी ग्रामविकास पॅनलशी चुरशीची लढत देत परिवर्तन ग्रामविकास पॅनलने 9 पैकी 8 जागेवर एकतर्फी विजय मिळविला. त्याबद्दल सर्व टिमचे कौतुक करून समाधान व्यक्‍त केले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!