विकास व विश्वासपात्र अर्थसंकल्प आहे – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : देशातील कृषी,शिक्षण,आरोग्य, पायाभूत सुविधा, महिला,युवक व वृद्ध या सर्वांना दिलासा देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री सौ.सीतारामन यांनी सध्याच्या कोरोना महामारीवरती मात करून मांडला असून त्याचे आपण हार्दिक स्वागत करीत आहोत, अशी प्रतिक्रिया माजी आ.तथा कृषी, शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली आहे.
माजी आ. कव्हेकर पुढे म्हणाले की, एम.एस.पी कायम ठेवून शेती मालाची खरेदी केली जाईल, जलजीवन सिंचन योजनेसाठी 2.5 लाख कोटी रुपयांची तरतूद, कृषी विकासासाठी पेट्रोलवरती 2.5 रुपये व डिझेलवरती 4 रुपये टॅक्स आकारणी केली, पेट्रोल-डिझेल वरील ड्युटी कमी केली. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी विदेशी साहित्यावर अधिक टॅक्स व देशी साहित्यावरील टॅक्स कमी केला आहे. देशाची प्रगती पायाभूत सुविधावरती अवलंबून असते त्यावरती 5.5 लाख कोटीची तरतूद केली आहे. शिक्षणामध्ये अनेक बदल केले असून 15000 शाळांचा विकास, 100 नवीन सैनिकी शाळा, सी.बी.सी.एस शिक्षणपद्धतीची अंमलबजावणी असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्यामुळे सर्वमावेशक व सर्व कल्याणकारी बजेट असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली आहे.