दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते साखर पोते पूजन व उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा शुभारंभ

दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते साखर पोते पूजन व उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा शुभारंभ

5 लाख 55 हजार 911 चालू गळीत हंगामात उत्पादीत साखर पोत्यांचा शुभारंभ

रेणापूर (प्रतिनिधी) : शेतकरी सभासदांच्या हिताला प्राधान्य देत आपल्या यशस्वी वाटचालीतून साखर उद्योगात नावलौकिक प्राप्त केलेल्या रेणा सहकारी साखर कारखाना येथे चालू गळीत हंगाम 2020- 21 मध्ये उत्पादित 5,55,911(50 कीलो) व्या साखर साखर पोत्याचे पूजन व आधुनिक तंत्रज्ञानातून उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचा शानदार शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक तथा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते शनिवारी 30 जानेवारी रोजी करण्यात आला. यावेळी लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन एस. आर. देशमुख रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, रेणाचे माजी चेअरमन तथा संचालक आबासाहेब पाटील, संत शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगे, रेणाचे माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील, मांजरा कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे, रेणाचे व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख,जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, विलास कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे, संत शिरोमणी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन शाम भोसले, रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संभाजी सूळ, जिल्हा काँग्रेस मिडिया अध्यक्ष हरिराम कुलकर्णी, सचिन दाताळ, विलास साखर कारखान्याचे संचालक गोविंद डुरे पाटील, प्रताप शिंदे, रेणा साखर कारखान्याचे संचालक संचालक संग्राम माटेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रेमनाथ आकनगिरे, धनराज देशमुख, प्रवीण पाटील, संजय हरिदास, तानाजी कांबळे, शहाजी हाके, संभाजी रेड्डी, वैशालीताई माने, अमृताताई देशमुख, लालासाहेब चव्हाण, अनिल कुटवाड, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. व्ही.मोरे सर्व खातेप्रमुख कर्मचारी यांची उपस्थिती होती.

About The Author