लावणीला जागतिक दर्जा मिळावा म्हणून सृष्टी जगताप यांचे कार्य कौतुकास्पद – राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राला कला व संस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे हा सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी शासन नेहमी प्रयत्नशील असते महाराष्ट्राचे लोक नृत्य लावणीला जागतिक ओळख मिळावी म्हणून लातूरच्या सृष्टी जगतापने 24 तास लावणी सादर करून आपले नाव आशिया बुक रेकॉर्ड मध्ये नोंदवले आहे सृष्टीचे हे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरउदगार राज्याचे पाणीपुरवठा, पर्यावरण सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी लातूर येथे काढले.
लातूरची सृष्टी जगताप या पंधरा वर्षाच्या मुलीने सलग चोवीस तास लावणी नृत्य सादर करून आशिया बुक मध्ये आपली नोंद केली आहे याबद्दल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सपत्नीक त्यांचा सत्कार केला यावेळी सृष्टी चे आई वडील, हास्यकलाकार बालाजी सुळ सृष्टीचे गुरु व नृत्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सचिन बोणे आजोबा बबन तुळशीराम माने इत्यादी नातेवाईक उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, महाराष्ट्राला कला व संस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. लोक कलेचा वारसा जतन व संवर्धन करण्याचे काम महाविकासआघाडी मार्फत होत आहे सृष्टी जगताप यांनी लावणी सारख्या लोकनृत्यला जागतिक ओळख मिळावी यासाठी केलेल्या या प्रयोगाची जागतिक स्तरावर नोंद झाली आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे त्याची आशिया बुक मध्ये नोंद झाली आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन. महाविकास आघाडी सरकार सृष्टी सारख्या नवोदित कलाकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशी ग्वाही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली .