आंबेडकरी चळवळीला फोडून राजकारण कराल तर खबरदार – निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)
उदगीर (प्रतिनिधी) : सध्या महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये फूट पाडून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जातो आहे. शासनाचा तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी उदगीर महोत्सव आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने आंबेडकरी चळवळीला किरकोळ समजू नये! वेळ पडल्यास सरकार उलथवून टाकू. अशा शब्दात राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक उदगीर महोत्सवाचे अध्यक्ष निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी सांगितले. या उदगीर महोत्सव आणि जाहीर सभेचे उद्घाटन लातूरचे काँग्रेसचे निरीक्षक तथा माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भारतीय दलित पॅंथरचे नेते लक्ष्मणराव भुतकर, पंकज काटे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती मधुकरराव एकुर्केकर, प्रबोधन प्रवचनकार शिवराज आप्पा नावंदे गुरुजी महाराज; चांबरगे महाराज! भन्ते नागसेन, सुवर्णाताई सांगवे, या उदगीर मेळाव्याच्या संयोजक राष्ट्रीय दलित अधिकार मंच लातूर जिल्हा अध्यक्ष सुष्मिता ताई माने, सत्यवती ताई गायकवाड ,सुवर्णाताई सांगवे! ज्योती डोंगरे, पाटोदेकर महाराज, वर्षा कांबळे, प्रेमा गायकवाड, संजय कुमार!अॅड. रुक्मिणी ताई सोनकांबळे, जागीरदारजी, शेख याकूब, बंटी घोरपडे! आकाश कस्तुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना निवृत्तीराव सांगळे (सोनकांबळे) यांनी सभेला उद्देशून बोलताना आंबेडकरी चळवळ एक झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये चार खासदार निवडून आले होते. दुर्दैवाने आंबेडकरी चळवळीची ताकद सर्वसामान्य लोकांना कळत नसल्यामुळे त्याचा गैरफायदा राजकीय लोक घेत आहेत. राजकीय लोकांचा तो हेतू मोडीत काढून सर्व गटातटांना एक करून राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या बॅनरखाली आंबेडकर चळवळ एक व्हावी, या उद्देशाने आपले प्रयत्न चालू आहेत. आणि आपल्या प्रयत्नाला निश्चित यश येईल. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना नौशाद मौलाना त्यांनी स्पष्ट केले की ,राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या बॅनरखाली निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) ते स्वखर्चाने प्रत्येक वेळी सामाजिक जाणिवा जपत आहेत. समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणाऱ्या समाजकंटकांच्या विरुद्ध प्रेमाचा संदेश घेऊन ते लढत आहेत. लढणाऱ्यांनी लढत राहावे, भांडण लावणारे यांनी लावत राहावे आम्ही मात्र प्रेमाचाच संदेश घेऊन प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेमाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करू. असे मौलाना नौशाद यांनी सांगितले,
पुढे बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षा पुढे नतमस्तक न होता, स्वखर्चातून मोठ मोठे कार्यक्रम आयोजित करून ते यशस्वी करण्याचा प्रयत्न निवृत्तीराव सांगवे सोनकांबळे हे सतत करत असतात.
दलित मुस्लीम ऐक्य चळवळीसाठी त्यांनी यापूर्वीही मोठा प्रयत्न केला होता. मात्र दुर्दैवाने तो यशस्वी झाला नाही, समाजामध्ये एकता निर्माण व्हावी! यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्याची त्यांची नैतिक जबाबदारी ही फार मोठी आहे. अशा शब्दात निवृत्तीराव सांगवे सोनकांबळे यांच्या कार्याचे कौतुक नौशाद मौलाना त्यांनी केले.
याप्रसंगी बोलताना भन्ते नागसेन म्हणाले की, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे नेते निवृत्तीराव सांगवे हे बुद्ध धर्माला मांणणारे असल्यामुळे! शांतीच्या मार्गाने चालणे ही त्यांची प्रवृत्ती आहे, संविधानाला प्राधान्य देऊन राजा असो की रंक असो सर्वांना समान अधिकार देणाऱ्या संविधानाचे रक्षण झाले पाहिजे. संविधानाला कोणी हात लावत असेल कांवा संविधान बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या विरुद्ध लढा उभारण्यात निवृत्तीराव सांगवे सोनकांबळे सदैव अग्रेसर असतात. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना देखील दलित पॅंथरच्या माध्यमातून त्यांनी कित्येक गोरगरीब विद्यार्थ्यांना अर्थसाह्य केले आहे. हे मी स्वतः पाहिले आहे .अत्यंत स्वाभिमानी असे हे व्यक्तिमत्त्व आहे. कोणापुढे झुकणार नाही, कोणाची लाचारी पत्करणार नाही, अशा स्वभावामुळे आणि कर्मधर्मसंयोगाने घरून श्रीमंती असल्यामुळे त्यांच्यामध्ये दातृत्वाची भूमिका मोठी आहे. इतरांना मदत करणे, समाजातील गोरगरीब घटकांना सहकार्य करणे. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे. हे त्यांच्या रक्तात भिनलेले आहे. विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी आज ते पेटून उठले आहेत.
त्यांचा उद्देश सकारात्मक आहे, सामाजिक जाणिवा जपणारा आहे, त्यामुळे निश्चित ते यशस्वी होतील. यात तिळमात्र शंका नाही. असा विश्वास आणि आशीर्वाद याप्रसंगी भन्ते नागसेन जी यांनी दिला.
या कार्यक्रमात लातूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती मधुकराव एकुर्केकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमात समाज प्रबोधन करणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम गीतकार, संगीतकार साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी देखील आपल्या गीतातून आणि प्रबोधनातून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. उदगीर येथील जिल्हा परिषद मैदानावर भव्य दिव्य अशा पद्धतीचा हा कार्यक्रम संपन्न झाला. उदगिर शहरच नव्हे तर मराठवाडा, सीमावर्ती भाग, कर्नाटका! तेलंगणा या भागातूनही आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संयोजिका राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुष्मिताताई माने यांनी केले. या मेळाव्या मागची भूमिका आणि आगामी काळात होणाऱ्या एकूण चळवळीची दिशा त्यांनी स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विजयकुमार कल्लुरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बहुजन विकास आघाडीचे प्रमुख संजय कुमार कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.