नगर पंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक जाहिर

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात २०२१-२१ मध्ये होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष आ.बाबासाहेब पाटील यांनी ना.संजयजी बनसोडे, खा.जनार्धन वाघमारे, प्रदेश सरचिटणीस श्री.बस्वराज पाटील नागराळकर, लातूर जिल्हा प्रभारी श्री.जीवनराव गोरे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष श्री.सुरज चव्हाण, श्री.डी.एन. शेळके आदी प्रमुख नेत्यांची चर्चा करून जिल्ह्यात होणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक जाहिर करण्यात आले चाकूरसाठी मकरंद सावे, बबन भोसले, देवणीसाठी मुर्तजा खान, शाम डावळे, जळकोटसाठी बबन भोसले, चंदन पाटील, शिरूर अनंतपाळ साठी बबन भोसले यांची नावे निरीक्षक म्हणून जाहिर करण्यात आली आहेत.