जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे ‘अभंग जागर’ चे आयोजन

जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे 'अभंग जागर' चे आयोजन

लातूर (प्रतिनिधी) : मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, जिल्हा लातूरच्यावतीने जगद्गुरु तुकोबाराय यांच्या जयंतीच्या निमित्ताने मंगळवार 2 फेब्रुवारी 2021 रोजी सायं.6:00 वा. ब्रिजलाल कदम यांचे निवासस्थान, हॉटेल गुरुच्या समोर, वसंतराव नाईक चौक, रिंग रोड, लातूर या ठिकाणी निमंत्रित कवींच्या उपस्थितीमध्ये अभंग जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी तथा गीतकार योगीराज माने हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित कवी म्हणून नरसिंग इंगळे, गोविंद जाधव, नामदेव कोद्रे, राजेंद्र माळी, वृषाली पाटील, नयन राजमाने, शैलजा कारंडे, रजनी गिरवलकर, ज्येष्ठ साहित्यिक विनायकराव कदम पाटील, मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष लिंबराज सूर्यवंशी, बालाजी जाधव उजेडकर, प्रा.सतीश हानेगावे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील नावडे, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष रंजना चव्हाण, जिल्हाध्यक्षा ताई बोराडे, तानुबाई बिर्जे पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग हे सर्वव्यापी असून या अभंगाचा यानिमित्ताने जागर व्हावा या उद्देशातून परिषदेच्यावतीने अभंग जागर या कार्यक्रमाचे आयोजन लातूरात पहिल्यांदाच होत करण्यात आलेले आहे. त्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष विवेक सौताडेकर, सचिव ब्रिजलाल कदम, उपाध्यक्ष प्रा.दत्ता माने किशनराव बिरादार, संघटक बाळासाहेब यादव, कार्याध्यक्ष युवराज ढविले, कोषाध्यक्ष मेघराज सूर्यवंशी, सहसचिव मनिषा गुंजरगे, डॉ. दिनेश भिसे आदींनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!