रामदास काटापल्ले यांना पीएचडी प्रदान

रामदास काटापल्ले यांना पीएचडी प्रदान

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील रहिवासी तथा धर्मापुरी येथील शंकरराव गुट्टे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक काटापल्ले रामदास नरसिंगराव यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची रसायनशास्त्रातील पीएचडी प्राप्त झाली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, रामदास काटापल्ले हे रसायनशास्त्राचे गाढे अभ्यासक असून त्यांनी प्रो. डॉ. सय्यद हुसेन सज्जनसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी चे संशोधन पूर्ण केल्याबद्दल त्यांना नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ने रसायनशास्त्रातील पीएच.डी. ही पदवी प्रदान केली. याबद्दल डॉ. काटापल्ले यांचा महात्मा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. सतीश ससाने व इतिहास विभागातील इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले. डॉ. रामदास काटापल्ले यांनी मिळवलेल्या यशाबद्दल धर्मापुरी येथील शंकरराव गुट्टे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष शिवाजीराव गुट्टे यांनी तसेच प्राचार्य डॉ. ताराचंद होळंबे व महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!