राज्याचे पोलिस महासंचालक डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी घेतली दिलीपराव देशमुख यांची सदिच्छा भेट
लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या कार्यकाळातील कार्य, कर्तुत्व, विकासाची दृष्टी यावर आठवणीचा दिला उजाळा
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे पोलीस (होमगार्ड) महासंचालक तथा तत्कालीन लातूर जिल्हा पोलिस दलाचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून उत्कृष्ठ कामगिरी केलेले डॉ भूषनकुमार उपाध्याय यांनी रविवारी सायंकाळी सहा वाजता लातूर दौऱ्यात राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या आशियाना निवासस्थानी भेट घेतली डॉ भुषणकुमार उपाध्याय यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री पदाच्या कार्य काळात त्यांनी केलेले कार्य, त्यांचे कर्तृत्व विकासाची दृष्टी यावर त्यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या सोबत चर्चा करताना त्यांच्या उत्कृष्ठ कार्यावर जून्या आठवणीना उजाळा दिला.
यावेळी पोलीस महासंचालक डॉ भुषणकुमार उपाध्याय यांनी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला याप्रसंगी लातूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक पराग जैन, स्थानीक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, पत्रकार हरिराम कुलकर्णी उपस्थित होते.
देशमुख परिवाराच्या वतीने डॉ उपाध्याय यांचा सन्मान
लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून डॉ भूषन कुमार उपाध्याय म्हणून कार्य केरत ते राज्याचे पोलीस (होमगार्ड) महासंचालक म्हणून बढती मिळाल्यावर पहिल्यांदाच लातूरला आले त्यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या आशियाना निवासस्थानी भेट दिली त्यावेळी त्यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.