सौ. मानिषाताई तिरणकर यांनी घेतली ‘माविम’ च्या अध्यक्षांची भेट

सौ. मानिषाताई तिरणकर यांनी घेतली 'माविम' च्या अध्यक्षांची भेट

आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर केली चर्चा

यवतमाळ (राम जाधव) : महिला आर्थिक विकास महामंडळच्या अध्यक्षा मा.ज्योतीताई ठाकरे या यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता विश्रामगृह येथे अ.भा.महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्षा सौ.मनिषाताई तिरणकर यांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत केले तसेच तळागाळातील महीला पर्यंत शासकीय योजना पोहचविण्याबाबत चर्चा केली. तसेच महाराष्ट्रातील आदिवासी जमातींचा विचार केला, तर त्या त्या भागातील भौगोलिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीनुसार आदिवासींचे प्रश्न बदलत गेले आहेत. सद्य स्थितीत आदिवासी स्त्री जगण्याच्या जीवघेण्या संघर्षात भरडून निघालेली आहे. तिचे जगणे असंख्य विरोधाभासानी भरलेले असून.आदिवासी महिलांच्या आर्थिक उन्नती करीता व विकासाकरिता त्यांच्याशी सखोल चर्चा केली यावेळी अनेक संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.

About The Author

error: Content is protected !!