राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा ‘कोरोना योद्धा सन्मान’ सोहळा संपन्न
राज्यातील 200 कोरोना योद्ध्यांचा केला सन्मान
लातूर (प्रतिनिधी) : राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातुरच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘कोरोना योद्धा’ सन्मान देवून गौरव करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास लातूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, विलासराव देशमुख शासकीय विज्ञान व संशोधन संस्थेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे, नगरसेविका सौ.सपनाताई किसवे, सुरेशभाऊ कांबळे, कॉमेडी-बिमेडी फेम बालाजी सुळ, सौ.संध्यताई जैन, अॕड.प्रमोद जाधव, दामिनी पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली गित्ते, डाॅ. कांचनताई जाधव, डाॅ. शिल्पाताई शिंदे, पत्रकार अजय घोडके, संस्थेचे अध्यक्ष बालाजी जाधव, कोषाध्यक्ष विशाल देवकते, उपाध्यक्ष राम शिंदे, सचिव विवेश शिंदे, सहसचिव श्रीकांत फोलाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या जिल्ह्यातील डॉक्टर, नर्स, पोलीस, पत्रकार, आशा वर्कर, आशा कार्यकर्त्यांनी, महानगर पालिकेच्या स्वच्छता कामगार,(108) रूग्ण वाहीका चालक महानगर पालीकेचे, अंतविधी करणारे कर्मचारी व सर्व लातुर शहरातील बल्ड बॕक अशा दोनशे कोरोना योद्धाना राजमाता बहुउद्देशिय सेवाभावी संस्था मार्फत कोरोना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 151 रक्तदात्यांनी रक्तदान केले. लाॅकडाऊच्या काळात जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी संस्थेच्या वतीने रक्त पुरवठा केला गेला.
यावेळी ‘रक्तदान हेच जीवन दान ग्रुप’ चे अनवर सय्यद, तुकाराम दोडके, मल्हारी तनपुरे, वैभव कोर्दे, अमोल हैळकर, किशोर संवडकर, निसार सय्यद, महादेव चरके, समाधान पुडकर, प्रविन बुबणे, कृष्णा वाडेकर, प्रशांत शिंदे, सतिश बोडके, संजय कोळी, रघुनाथ कराड, अरमान शेख, कृष्णा जाधव, व्यंकट मुळगे, रोहित जाधव, शरद सावंत, प्रकाश खराडे, महेश बदामे, राहुल राजपुत यांच्यासह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसाद मोठे व प्रस्तावना विशाल देवकते यांनी तर आभार संस्थापक अध्यक्ष बालाजी जाधव यांनी मानले.