राज्यातील हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवून पुन्हा खरेदी सुरू करा – नागनाथ बोडके

राज्यातील हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवून पुन्हा खरेदी सुरू करा - नागनाथ बोडके

उदगीर( प्रतिनिधी) : राज्यातील हरभरा खरेदी चे उद्दिष्ट वाढवून पुन्हा पूर्ववत खरेदी सुरू करावी. जेणेकरून कित्येक शेतकरी यांच्याकडे अद्यापही हरभरा शिल्लक आहे, तो विकला जाईल. आणि खरिपाच्या पेरणीसाठी आणि शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे खेळतील. अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष युवा नेते नागनाथ बोडके यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

बोडके यांनी सदरील निवेदनात नमूद केले आहे की, या हंगामात उत्पादित झालेल्या हरभऱ्याची खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या कारणाने खरेदी थांबवण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकीकडे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी थांबवली, तर दुसरीकडे आजही नोंदणी केलेल्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा हरभरा विक्री शिवाय पडून आहे. सदरील खरेदी प्रक्रिया शासनाने पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. त्या शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष आपली भूमिका मांडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या परिस्थितीचा विचार करून राज्य शासनाकडून हरभरा खरेदी चे उद्दिष्ट वाढवून तसेच तारखेची मर्यादा सुद्धा वाढऊन हरभरा खरेदी तातडीने पुर्ववत करण्यात यावी. व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. अशीही मागणी नागनाथ बोडके यांनी केली आहे.

About The Author

error: Content is protected !!