सिद्धी शुगरचा यशस्वी व उंच्चाकी गळीत हंगामाने ‘सांगता-समारंभ’ संपन्न …!

सिद्धी शुगरचा यशस्वी व उंच्चाकी गळीत हंगामाने 'सांगता-समारंभ' संपन्न ...!

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील उजना येथील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड साखर कारखान्याने हंगामा २०२१-२२ च्या गळीत हंगामात दोनशे आठ दिवसात ६ लाख ५३ हजार मेट्रिक टन पेक्षा अधिक उसाची गाळप करून ६ लाख ३२ हजार ६०० किंवटल पेक्षा जास्त साखरेचे उत्पादन केले आहे हंगाम २०२१-२२ या यशस्वी व उच्च अंकी गळीत हंगामाचा ‘सांगता- समारंभ’ शुक्रवार दिनांक २७ मे रोजी कारखान्याचे मार्गदर्शक माननीय बाळासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे चेअरमन आमदार बाबासाहेब पाटील व्यवस्थापक संचालक अविनाश जाधव, कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी. जी. होनराव, जनरल मॅनेजर गुडेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत कर्मचारीव कामगार यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाण पूजन करून सांगता समारंभ संपन्न झाला
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हिंगणे, टेक्नो सर्व्हिसेस लोंढे साहेब, काळे सर, इंजिनीयर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती २०२१ – २२ हंगामाच्या सुरवातीला उसाचे प्रति मेट्रिक टन २३५० रू भाव देण्याचे जाहीर केले होते तथापि आत्ता पर्यंत झालेले गाळप व उतारा लक्षात घेता आपला कारखाना रुपये २४०० ते २४२५ रुपये प्रति मेट्रिक टन पर्यंत उसाचा भाव देऊ शकेल असे मनोगत चेअरमन यांनी व्यक्त केले

पुढील हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याचे गाळप ७ लाख ५० हजार मेट्रिक टन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे चालू हंगामात विक्रमी गाळप केल्याबद्दल माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी सर्व ऊस तोडणी कामगार, उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार, मजूर आदींचे अभिनंदन केले आहे ऊस तोडणी , ऊस वाहतूक इ मध्ये प्रथम , द्वितीय , तृतीय आलेल्या वाहतूक ठेकेदार आणि तोड मुकदम यांना प्रसिद्धी पत्र देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला शरण चंवडा अहमदपूर यांनी गळीत हंगाम २०२१ -२२ मध्ये आडसाली विक्रमी ऊस उत्पादन एकरी ८२ मेट्रिक टन घेऊन अहमदपूर तालुक्यांमध्ये उच्चांक प्रस्थापित करून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा सिद्धी शुगर कारखान्याचे चेअरमन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. येणाऱ्या पुढील हंगामात ऊस तोडणी यंत्राने ऊस तोडणी करण्याकरता पाच फूट रुंद सरीचा अवलंब करावा, एकरी उत्पादन जास्तीत जास्त घेण्याकरता सदर रुंदी सरीचा वापर करणे गरजेचे आहे तसेच उसाचे नियोजन बद्दल होण्याच्या दृष्टीने काही ऊस आडसाली, काही पूर्वहंगामी खोडवा या पद्धतीने आडसाली पूर्वहंगामी ऊस लागवड करावी असेही आव्हान करण्यात आले या ‘ सांगता- समारंभ’ कार्यक्रमात अधिकारी कर्मचारी व कामगार यांना पुरस्कार पूरक म्हणून सतरा दिवसाचा पगार बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आला.

About The Author

error: Content is protected !!