फुले महाविद्यालयात आज हिंदी विषयाचे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त विविध विभागाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने हिंदी विभागाच्या वतीने आज आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर च्या महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूरच्या हिंदी विभागाच्या वतीने ‘वैश्वीकरण के परिप्रेक्ष मे हिंदी भाषा व साहित्य ‘ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय ई – चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे आहेत. तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर चे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर यांची विशेष उपस्थिती तर किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर चे सचिव ज्ञानदेव झोडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून या चर्चासत्राचे उद्घाटन व बीजभाषण चीन येतील डॉ. विवेक मनी त्रिपाठी हे करणार असून यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव तसेच दिल्ली येथील रामानुजन महाविद्यालयातील हिंदीचे प्राध्यापक डॉ. रंजन पांडेय हे मार्गदर्शन करणार असून या चर्चासत्राच्या निबंध वाचन सत्राचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रो. डॉ.रमेश कुरे हे भूषविणार आहेत. तर, मध्यप्रदेश येथील डॉ. आशा राठोड, महाराष्ट्र येथील डॉ. बी.बी.राठोड, एस . बी. साळुंके हे प्रातिनिधिक स्वरूपात निबंध वाचन करणार आहेत. या चर्चासत्रासाठी आभासी पद्धतीने जास्तीत जास्त प्राध्यापक, हिंदी प्रेमी, शोधार्थी आदींनी उपस्थित राहावे असे आवाहन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी व संयोजक प्रो. डॉ. नागराज व सहसंयोजक डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले आहे.
