सुमठाणा सोसायटी चेअरमन पदी डिंगबरराव पोले मामा यांची बिनविरोध निवड

सुमठाणा सोसायटी चेअरमन पदी डिंगबरराव पोले मामा यांची बिनविरोध निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मौजे सुमठाणा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी डिंगबराव पोले मामा तर व्हा.चेअरमन पदी नागनाथ होनराव यांची दि 26 मे रोजी निवडणूक अधिकारी आर सी संघई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तसेच या आयोजित बैठकीत सोसायटीच्या नुतन संचालक मंडळाची देखिल खेळी मेळीच्या वातावरणात बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी गटसचिव डी पौळ, संचालक दिगंबराव पंढरीनाथ पोले, नागनाथ विश्वनाथ होनराव, मुसळे धोंडीराम मुकुंदा, पोले बाबुराव गोविंद, मुसळे श्रीराम धोंडीराम, मुसळे शिवरत्न सोपान, मुसळे सुभाष विश्वनाथ, पोले मारोती भागोजी, पोले राम संजयराव, नामपल्ले तुकाराम शेषेराव, पोले राजुबाई शिवदास मुसळे हारीबाई चरण आदिंची उपस्थिती होती. या बिनविरोध निवडीबद्दल माजी पंचायत समिती सदस्य मदन मुसळे गणेश पोले, पोलिस पाटील पप्पू हामणे, भगवान पोले, विश्वनाथ पोले सिद्राम मुसळे ,तुकाराम पोले,मंगेश पोले, बळीराम पोले, दगडू मुसळे, गुणवंत मुसळे, ज्ञानोबा पोले, पत्रकार नंदराज पोले पाटील, आदींनी चेअरमन, व्हा. चेअरमन व नुतन संचालकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!