युवकांना बोलते करून नेतृत्व गुण विकासासाठी” यंग इंडिया के बोल ” या राष्ट्रीय स्तरावरील भाषण स्पर्धा – विजय निटूरे
उदगीर (अॅड.एल.पी.उगीले) : स्थानिक,जिल्हा,राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर भाषणाच्या माध्यमातून प्रवक्ते घडविण्यासाठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते,या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून केंद्रातील भाजप सरकारकडून होत असलेली तरुण तसेच इतर वर्गाची मुस्कटदाबी या विरोधात आवाज बुलंद करण्याची क्षमता असलेले तरुणांसाठी हि संधी भारतीय युवक काँग्रेसने उपलब्ध करून दिली आहे.आशि माहिती लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे आधक्ष्य विजायभैया राजेश्वर निटूरे यांनी दिली.
महागाई,बेरोजगारी आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे विषय घेऊन तरुण या स्पर्धेत भाषण करणार आहेत.अभ्यासू आणि भूमिका भक्कमपणे मांडणाऱ्या तरुणांना युवक काँग्रेसच्या प्रवक्ते पदी याद्वारे नियुक्त करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत अधिकाधिक तरुण – तरुणींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.विजय निटूरे,युवक काँग्रेस उदगीर जळकोट विधानसभा अध्यक्ष अमोल कांडगिरे,जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास एकुर्गेकर,उदगीर सोशल मीडिया अध्यक्ष अमोल घुमाडे, युवक काँग्रेस उदगीर जळकोट तालुका सरचिटणीस रवी पाटील,नागेश पटवारी,सद्दाम बागवान,एशवंत पाटील,आशिष चंदेले,प्रकाश गायकवाड,जावेद शेख,शिवा पकोळे,नंदकुमार पटणे,अजय कबाडे त्याबरोबर युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
