आंबेडकरी चळवळीतील संवाद गतिमान करण्यासाठी त्रै. मुक्तमंथन ची गरज आहे. प्रा.डॉ.नारायण कांबळे

आंबेडकरी चळवळीतील संवाद गतिमान करण्यासाठी त्रै. मुक्तमंथन ची गरज आहे. प्रा.डॉ.नारायण कांबळे

अहमदपूर (गोविंद काळे) : दि. त्रैमासिक मुक्त मंथन चा लेखक वाचक मेळावा दि. 28/05/2022 रोजी अहमदपूर जिल्हा लातूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला‌.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ नारायण कांबळे सर अध्यक्ष समाजशास्त्र अभ्यास मंडळ स्वा. रा. ति. म. वि. नांदेड, हे होते. ते म्हणाले की, प्रतिगामी शक्ती दिवसेंदिवस मजबूत होत असताना आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना, संस्था व कार्यकर्त्यामधील संवाद खुंटत आहे. आंबेडकरी समाजाकडे जसजशी आधुनिक सुविधा व साधने आलीत तशी संवादाची गती कमी होत असताना दिसत आहे. ती अधिक सकारात्मक व परिणामकारक करण्यासाठी त्रैमासिक मुक्तमंथन सारख्या माध्यमाची गरज आहे.तर प्रा. डॉ. ज्ञानेश कांबळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उद्घाटक प्रा. डॉ. सारिका केदार अध्यक्षा पाली अभ्यास मंडळ स्वा. रा. ति., म. वि. नांदेड, त्रैमासिक मुक्त मंथन च्या संपादिका सुनंदा ताई बोदिले अमरावती, सहसंपादक डॉ चंद्रकांत सरदार सर यवतमाळ हे उपस्थित होते त्यांनी मुक्तमंथन ची भूमिका मांडली,याच कार्यक्रमात काव्यसंग्रहावर चर्चा सत्र व निमंत्रितांचे कवी संमेलनात आयोजित करण्यात आले होते. काव्य चर्चा सत्रात विद्रोही कवी राजेंद्र कांबळे यांच्या फेरफार या काव्यसंग्रह वर प्रा. डॉ. सा.द.सोनसळे सर मराठी अभ्यास मंडळ सदस्य स्वा. रा. ति. म. वि. नांदेड प्रफुल्ल धामणगावकर सर यांच्या कविता नागवंशाच्या या कविता संग्राहावर डॉ कीर्ती कुमार मोरे सर मराठी विभाग प्रमुख संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले. प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा. डॉ. सिंधूताई खंदारे भूगोल विभाग प्रमुख अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव व प्रा. डॉ. अनिल सिनगारे इतिहास विभाग प्रमुख संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड हे उपस्थित होते. निमंत्रितांचे कवी संमेलन राजेंद्र कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.अनेक कवींनी आंबेडकरी चळवळीच्या आणि जानिवेच्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली कार्यक्रमाचे आयोजन बा. ह. वाघमारे, बालाजी तुरेवाले, वेणूताई जोगदंड, प्रफुल्ल धामणगावकर सर, प्रभाकर कांबळे सर यांनी यशस्वी पणे पार पडला. या कार्यक्रमास साहित्य क्षेत्रातील बरीच मान्यवर मंडळी उपस्थित होती.

About The Author

error: Content is protected !!