शेतकर्‍यांना लुबाडाल तर धिंड काढून ,मनसे स्टाईलने आंदोलन करू – संजय राठोड

शेतकर्‍यांना लुबाडाल तर धिंड काढून ,मनसे स्टाईलने आंदोलन करू - संजय राठोड

उदगीर (एल.पी. उगिले) : सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या दिवसात खते, बी-बियाणे काळ्याबाजारात घ्यायला भाग पाडणाऱ्या ्यापार्‍यांची धिंड महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईल खळ खट्याक आंदोलन करण्यात येईल. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी दिला आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की ,शेतकऱ्यांना खते ,बी-बियाणे खरेदी करण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात आणि योग्य दरात सर्व मिळाले पाहिजे. अशा पद्धतीचे आदेश राज्यमंत्री यांनी दिले होते म्हणे! मात्र कृषी केंद्राचे व्यापारी आणि कृषी अधिकारी यांनी संगनमताने खते ,बी-बियाणे यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून ज्यादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी शेतकरी सर्रास करत आहेत. इतकेच नाही तर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांनी राज्य मंत्र्याच्या आदेशाचा हवाला देत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या समोर जवळपास पाच तास ठिय्या आंदोलन केले. मात्र त्याला कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. ही अत्यंत शोकांतिका आहे. लोकशाहीचा हा अपमान आहे.

शेतकऱ्या वर होणारा अन्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि सहन करणार नाही, असेही संजय राठोड यांनी स्पष्ट केले. मान्सून कोणत्याही क्षणी येऊ शकतो. अशी परिस्थिती असताना शेतकरी पेरणीची लगबग करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मशागती पूर्ण करून ठेवलेल्या आहेत. आता बी -बियाणे व खते खरेदीसाठी उदगीरच्या बाजारात प्रत्येक दुकानात शेतकऱ्यांची भटकंती चालू आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीनुसार योग्य दरात रासायनिक खते मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. तसे निवेदन ही तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहे. (जुन्या) गेल्यावर्षीचा खत नव्या किमती सांगून शेतकऱ्यांना विकल्या जात आहेत. अनेक कृषी दुकानदारांच्या गोडाउन मध्ये मुबलक प्रमाणात रासायनिक खते असूनही शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ करत आहेत. अशी तक्रार शेतकरी करत आहेत.

योग्य दरात रासायनिक खते उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल असा इशाराही संजय राठोड यांनी दिला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर काही प्रश्न कृषी अधिकाऱ्याला विचारले असता त्यांना उत्तरे देता आली नाहीत. हेही लाजिरवाणी आहे. उदगीर तालुक्यासाठी रासायनिक खताचा किती पुरवठा झाला आहे? किती शेतकऱ्यांना रासायनिक खत देण्यात आले? याबाबत तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांच्याकडे शेतकऱ्यांनी माहिती मागितली तेव्हा जिल्ह्यातील अधिकाऱ्याकडे ही माहिती असते असे सांगून वेळ मारून नेली. हा ही शेतकऱ्यांचा अपमान आहे. असा अपमान आपण कदापि सहन करणार नाही. शेतकऱ्यांनी अत्यंत महत्त्वाचा वेळ असताना देखील तब्बल पाच तास आंदोलन केले. तसेच खते उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांना योग्य दरात खते उपलब्ध करुन नाही दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या प्रसंगी संजय राठोड यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्या वर होणारा कोणताही अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. असे स्पष्ट वक्तव्य संजय राठोड यांनी केले आहे. राज्य मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या व्यापारी आणि कृषी अधिकाऱ्याला कोण जाब विचारावा? हे राज्यमंत्र्यांनी ठरवावे .असेही ते उपरोधाने राठोड बोलले.

About The Author

error: Content is protected !!