दावणगाव येथे मोफत उन्हाळी वासंतीक वर्गाचा समारोप कार्यक्रम संपन्न

दावणगाव येथे मोफत उन्हाळी वासंतीक वर्गाचा समारोप कार्यक्रम संपन्न

उदगीर : मानवता विकास प्रतिष्ठान दावणगावच्या वतीने उन्हाळी वासंतीक वर्ग गेल्या एक महिन्यापासून मोफत घेण्यात आले. या वर्गात इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. इंग्रजी, गणित व विज्ञान या तीन विषयाचे अध्यापन करण्यात आले. सकाळी 7 ते 9 या वेळात वर्ग घेण्यात आले. शेवटी अंतिम परिक्षा घेऊन प्रथम, द्वितीय, त्रृतिय येणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. 1011 रु, 751 रु, 551 रु असे बक्षीस कै. गुंडेराव माधवराव भंडे यांच्या स्मरणार्थ मा. विश्वंभर भंडे यांच्या वतीने देण्यात आले. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून उदगीर तालुक्याचे तहसीलदार मा. रामेश्वर गोरे साहेब उपस्थित होते. तसेच मा रमेश भंडे, चेअरमन मा. व्हा. चेअरमन मा धनाजी मुळे, मा. यशवंतराव बिरादार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक, मा. प्रकाश साखरे, प्रसिद्ध उद्योजक व प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक, अध्यक्षस्थानी मा. उमाजीराव मुळे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक, मा. माधवराव फावडे शिक्षक नेते, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तहसीलदार साहेबांनी प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक कामाची प्रशंसा केली. प्रतिष्ठानच्या कामासाठी वाटेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. लोकप्रतिनिधींनी अशा विधायक कामास राजकारण बाजूला ठेवून मदत करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशनराव बिरादार यांनी केले. तर आभार रमेश जाधव यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रफीक बागवान,पांडूरंग फुले, बाबूस भंडे, मारोती मधुकर भंडे, पुंडलीक भोळे, विश्वंभर भंडे, प्रभुदास मोहीते, संतोष पताळे,इत्यादीने परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!