अहमदपूर येथील भूमिअभिलेख कार्यालयामध्ये उपअधीक्षक रुजू…

अहमदपूर येथील भूमिअभिलेख कार्यालयामध्ये उपअधीक्षक रुजू...

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरामध्ये गेल्या चार-पाच महिन्यांपासून भूमिअभिलेख कार्यालयामध्ये उपअधिक्षक हे पद रिकामे होते अहमदपूर आणि उदगीर या दोन तालुक्याचा कार्यभार उपअधिक्षक यांच्याकडे असल्यामुळे अहमदपूर शहरातील भूमी अभिलेख कार्यालया मधील सर्व कामे गुंठेवारी, प्लॉटचा नकाशा , जमीन मोजणी, अशी कामे प्रलंबित होती. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश देवणे यांनी लातुरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे कर्मचारी वर्ग आणि कायमस्वरूपी उपअधिक्षक या कार्यालयात देण्याची मागणी केली होती. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी तीन चार दिवसात हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन महेश देवणे यांना दिले होते. त्यानुसार या ठिकाणी कायमस्वरूपी भूमिअभिलेख कार्यालय मध्ये उपअधिक्षक जिल्हा पुणे येथुन पाठवण्यात आले असून त्यांनी काल पदभार स्वीकारला आहे.

अहमदपूर शहरामध्ये गेल्या पाच सहा महिन्यापासून लोकांनी आपापसात लाखोच्या वर व्यवहार केले आहेत परंतु गुंठेवारी आणि त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडून लागणारा नकाशा या दोन शर्ती शासनाकडून देण्यात आल्या आहेत. गुंठेवारी असल्याशिवाय बयनामे होत नाहीत म्हणून जणतेनी नगरपालिकेकडे गुंठेवारी साठी प्रस्ताव दाखल केले परंतु नगरपालिकेकडे पाठवण्यात आलेल्या गुंठेवारीच्या प्रस्तावास भूमी अभिलेख कार्यालयाच्या नकाशाच्या प्रतची आवश्यकता असल्याने नगरपालिकेने ते प्रस्ताव भुमिअभिलेख कार्यालयाकडे पाठवले . परंतु भुमिअभिलेख कार्यालयात उपअधिकक्षक आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे ही सर्व कामे खोळंबली होती आणि आम जनतेतून या कार्यालयात साहेब नसल्या कारणास्तव संताप व्यक्त केला जात होता. दोन-तीनशे प्रस्ताव या कार्यालयामध्ये धूळखात पडलेले होते.

रोज या कार्यालया मध्ये दीडशे ते दोनशे लोक कामासाठी चकरा मारत होते. परंतु कुठलेच काम होत नसल्याने दिवसभर बसून रिकाम्या हाताने हाताश होऊन वापस गेल्याशिवाय लोकांना पर्याय नव्हता.

नुकताच या ठिकाणी हायकोर्टाने बयनाम्यासाठी गुंठेवारीची गरज लागणार नाही असा निर्णय दिला परंतु त्याचे परिपत्रक दुय्यम निंबधक कार्यालयाला आले नसल्याने दय्यम निंबधक अधिकारी हतबल झाले असुन अजूनही बयनामे होत नाहीत जनतेतील हा आक्रोश पाहून या गंभीर प्रश्नाची दखल लक्षात घेता महेश देवणे यांनी या बाबीकडे लक्ष देऊन या ठिकाणी अधिकाऱ्यांची मागणी केली आणि जनतेला होत असलेला त्रास थांबवण्यासाठी प्रयत्न केले यामध्ये त्यांना यश आले आणि काल उपअधिक्षक आ. सी.रोकडे साहेब कार्यालयात रुजू होताच देवणे यांनी जनतेची खोळंबलेली कामे तात्काळ करावीत असे लेखी निवेदन दिले त्याची एक माहितीस्तव प्रत उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनाही देण्यात आली आहे. महेश देवणे यांच्या प्रयत्नाला यश आल्याने सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

About The Author

error: Content is protected !!