सिंहगड घाट रस्त्यावर झाडाला गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या
पुणे : सिंहगडावर जाणाऱ्या घाट रस्त्या लगत परिसरात एकाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्म हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विलास तुकाराम खामकर (वय 46. रा. आतकरवाडी. घेरा सिंहगड. ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत खामकर हे आतकरवाडीतुन जाणाऱ्या सिंहगडाच्या पायवाटेवर लिंबु सरबत विकण्याचा व्यवसाय करत होते. विलास खामकर यांच्या कुटुंबातील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार. ते दारू पिऊन आले कि घरात वादविवाद व्हायचे. दरवेळी ते मी जीव देईन अशी दमकी द्यायचे . काल त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसा च्या दिवशी दारू का पिलात? अशी विचारणा केल्याने त्यांचे पत्नीशी भांडण झाले. त्या रागातुन ते घरातुन निघुण गेले व गळफास घेऊण आत्महत्या केली.
दरम्यान. सिंहगड च्या घाट रस्त्यावर एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहीती समजताच घेरा सिंहगडचे पोलीस पाटील निलेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हवेली पोलीस ठाण्याचे पोलीसही दाखल झाले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला . मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससुन रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत. दरम्यान. नेमकी आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दारुचे व्यसन व कौंटुंबिक वादविवाद यातुन सदर व्यक्तीने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.